🚨 पोलिस भरती प्रक्रिया UPDATE

0

 पोलिस भरतीसाठी नवीन नियम: एकाच जिल्ह्यातून सहभागी होण्याचे हमीपत्र द्या, अन्यथा प्रक्रियेतून बाहेर काढले जाईल



बऱ्याच काळापासून थांबलेली पोलिस भरतीची प्रक्रिया गेल्या दोन महिन्यात पासून सुरू आहे. भरती प्रक्रियेत पोलिस प्रशासन वारंवार काही ना काही बदल करत असते. आता पोलिस प्रशासनाने नवीन नियम जाहीर केला आहे.यामध्ये उमेदवारांना पोलिस भरतीसाठी ( Police Bharti ) एकाच जिल्ह्यातून अर्ज करता येणार आहे.एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलीस अधीक्षक कार्यालयात त्याबाबत हमीपत्र द्यावे अशी सूचना गृह खात्याने दिली आहे. यासाठी गृह खात्याने हमी पत्र भरण्याची शेवटची तारीख जाहीर केली आहे.हमीपत्र भरण्याची अंतिम मुदत 17 मे पर्यंत देण्यात आली आहे.

अर्ज पडताळणी करताना गृह खात्याच्या लक्ष्यात आले आहे की उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून अर्ज भरले आहेत, असे उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्याने भरती ( Police Bharti ) प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात.त्यामुळे जे विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत त्यांचे नुकसान होते.असा धोका टाळण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही एकाच जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे.त्यासाठी त्यांच्याकडून तसे हमीपत्र घेण्यात येणार आहे. राज्यात सुमारे १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया पार पडत आहे.

....नाहीतर अर्ज बाद होणार ( Police Bharti )

जिल्ह्यात पोलिस अधीक्षक कार्यालयात जावे, आणि उमेदवाराने जिल्ह्याची निवड करून हमीपत्र द्यावे.अशी सूचना प्रशिक्षण व खास पथके विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.१७ मे पर्यंत हमीपत्र जमा करा, नाहीतर त्यानंतर येणारे अर्ज बाद होतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अजून महत्वाच्या माहितीसाठी: https://www.nokarbharti.com


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top