BMC 2024 Recruitment: तब्बल १,८४६ रिक्त पदे भरली जाणार, मुंबई महापालिकेत बंपर भरती !
BMC Nokar Bharti 2024: आत्ताच्या सर्वात मोठ्या बंपर भरतीची जाहिरात आलेली आहे. मुंबई महापालिकेत तब्बल १,८४६ रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. ( BMC recruitment 2024 ) यामध्ये कार्यकारी सहाय्यक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. 20 ऑगस्ट पासून ऑनलाईन अर्ज प्रणाली चालू होईल. 9 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख राहील. या भरतीसाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील मजकूर वाचा.
BMC Clerk Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीद्वारे उमेदवारांना आकर्षक पगार दिला जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( शहर ) डॉ. ( श्रीमती ) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीच्या अधिक माहिती म्हणजेच पात्रता, आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच वेतनश्रेणी पाहण्यासाठी खालील दिलेली PDF वाचा.
BMC Clerk Recruitment 2024
भरतीचा विभाग - बृहन्मुंबई महानगरपालिका
भरतीचा प्रकार - सरकारी नोकरी
श्रेणी - राज्य सरकार श्रेणी
नोकरीचे ठिकाण - बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
पदाचे नाव - क्लर्क ( Clerk )
एकूण रिक्त पदे - १,८४६
आवश्यक शैक्षणिक पात्रता - पदानुसार ( यासाठी PDF पहा )
वयोमर्यादा - वयोमार्यादा आणखी निर्दिष्ट करण्यात आली नाही.
वेतनश्रेणी - पदानुसार
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन ( Online )
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख - 20 ऑगस्ट 2024
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 9 सप्टेंबर 2024
अर्ज कसा करावा ?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भरतीसाठी https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या संकेस्थळावर जाऊन संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तीं वाचून जाहिरात वाचावी. यामध्येच अर्जाची लिंक दिलेली आहे.
मार्गदर्शनासाठी मदत म्हणून 9513253233 हा मदतसेवा क्रमांकही जरी करण्यात आलेला आहे. या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल.
भरतीसाठी PDF लिंक लवकरच उपलब्ध होईल.
अधिक माहितीसाठी किंवा नोकरीच्या अधिक अपडेट्स साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇🏻👨🏻💻